*मतदार हा लोकशाहीचा आत्मा आहे — संजय खिल्लारे*

0
571318.jpg

“के. के. महाविद्यालयात मतदार नोंदणी अभियान; ३५ विद्यार्थ्यांची नोंदणी”

परभणी/प्रतिनिधी :- रमेश मुलगीर

“मतदार हा लोकशाहीचा आत्मा आहे. त्यामुळे १८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याने मतदार यादीत नाव नोंदवून लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा,” असे प्रतिपादन मानवत तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार तथा नोडल ऑफिसर श्री. संजय खिल्लारे यांनी केले.
के. के. महाविद्यालय, मानवत येथे १८ वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी मतदार नोंदणी अभियान आयोजित करण्यात आले. यावेळी संजय खिल्लारे यांनी मतदार नोंदणी प्रक्रिया, मतदानाचा अधिकार आणि लोकशाहीतील मतदारांचे महत्त्व याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. के. जी. हुगे होते. यावेळी मूल्यशिक्षण समिती प्रमुख प्रा. डॉ. पंडित लांडगे, चंद्रकांत पोळ, एसआर प्रमुख,रासवे बापू, रुपेश गौतम मंडळ अधिकारी,राहुल खाडे यांच्यासह प्रा. सुनील कुकडे डॉ. एस. आर. राठी ., संजय देशमुख, राहुल भाले तसेच महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
अध्यक्षीय समारोपात डॉ. के. जी. हुगे यांनी विद्यार्थ्यांनी मतदानाचा अधिकार जबाबदारीने बजावून लोकशाही बळकट करण्याचे आवाहन केले. या अभियानात एकूण ३५ विद्यार्थ्यांनी मतदार नोंदणी केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. डॉ. पंडित लांडगे यांनी केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed