केक तोंडाला लावल्यानं बर्थडे बॉयने तिघांवर झाडल्या गोळ्या; नगरसेवकाच्या २ भावांसह पुतण्याचा मृत्यू, फरार आरोपीचा शोध सुरू

0
download (5)

उत्तर प्रदेशात बर्थडे पार्टीत केक तोंडाला लावल्याने झालेल्या वादातून तिघांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडलीय. बुलंदशहर जिल्ह्यातल्या खुर्जा इथं घडलेल्या या घटनेनं खळबळ उडाली आहे. या प्रकरणामुळे पोलीस दलही हादरले आहे. पोलीस महासंचालकांनी पोलिसांची पथके तयार करून या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत.

गोळीबार करणारा आरोपी जीतू हा समाजवादी पार्टीचा असून तो माजी शहर अध्यक्ष होता. तर मृत्यू झालेले तिघे जण हे भाजपचे कार्यकर्ते असल्याचं सांगण्यात येतंय. मनीष, अमरदीप आणि आकाश असं त्यांचं नाव आहे. हा हल्ला राजकीय वादातून झाला का हे अद्याप समोर आलं नाही. पण प्राथमिक तपासात पार्टीत केक लावण्यावरून वाद झाला हेच मुख्य कारण सांगितलं जात आहे.

हत्या झालेल्यापैकी दोघे नगरसेवकाचे भाऊ आणि पुतण्या आहेत तर एका चुलत भावाचा समावेश आहे. यातील एक अल्पवयीन असल्याचं सांगण्यात येत आहे. मनीष आणि अमरदीप हे नगरपालिकेचे नगरसेवक संजय सैनी यांचे भाऊ आहेत. तर १७ वर्षीय आकाश हा त्यांचा पुतण्या आहे.

डिआयजी कलानिधी नैथानी यांनी सांगितलं की, तिहेरी हत्या कांडाचा तपास केला जात आहे. आरोपी जीतू फरार आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहे. पूर्व वैमनस्य, राजकीय वाद की घटनास्थळी झालेला वाद यातून हे हत्याकांड घडलं याचा शोध घेण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेमुळे बुलंदशहरमध्ये खळबळ उडाली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed