अमरावती ग्रामीण गुन्हे शाखेच्या पोलीसांची मोठी धडक कारवाई
अमरावती ग्रामीण गुन्हे शाखेच्या पोलीसांची मोठी धडक कारवाई. अमरावती जिल्हा -अमरावती ग्रामीण गुन्हे शाखेने गुप्त माहिती च्या आधारे कारवाई करत तीन आरोपींना पकडून त्याच्या कडून देशी आणि विदेशी दारूच्या सत्तावीस पेट्या जप्त करण्यात आल्या, एकूण 1,60,435 रुपये किंमतीच्या दारूच्या 27 पेट्या जप्त करण्यात आल्या. अमरावती ग्रामीणच्या गुन्हे शाखेच्या पथकाने दर्यापूर, अंजनगाव सुर्जी रोडवर गस्त घालत असताना प्रणय बिहाडे यांनी आपल्या घराच्या मागे गोडावूनमध्ये देसी/विदेशी दारू विकत असल्याची माहिती मिळाली.हा दारू साठा अवैध होता ही गंभीर बाब लक्षात घेऊन अमरावती गुन्हे शाखेच्या पथकाने गोडाऊनवर धाड करून 1 लाख 60 हजार 435 रुपये किंमतीच्या त्याच विदेशी दारूच्या 17 पेट्या जप्त केल्या आणि 3 आरोपींना अटक केली. प्रणय सुरेशराव बिहाडे (वय 47), आकाश संजय कपिले (वय 29, रा. गांधीनगर, बनोसा दर्यापूर), संतोष ओमप्रकाश बर्डे (वय 44, रा. बाबळी दर्यापूर), नितीन बिहाडे (वय 44, रा. दर्यापूर अशी अटक केलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत. या प्रकरणी ग्रामीण गुन्हे शाखेचे वरिष्ठ अधिकारी अशोक लांडे, पोलिस उपनिरीक्षक सतीश झलताटे, आकाश शिवणकर, पोलिस हेड कॉन्स्टेबल चेतन दुबे, दिनेश कनोजिया, सचिन गायधाणे, प्रशांत वैद्य, हर्षद घुसे यांच्या मार्गदर्शनाखाली उपरोक्त सर्व आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपासासाठी आरोपींना दर्यापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढिल तपास दर्यापूर पोलीस करत आहे. जिल्हा प्रतिनिधी -कैलास वाकपांजर

