पोलीस आयुक्तालय हद्दीत ०५ ठिकाणी जुगार कार्यवाही करून २८ आरोपी कडून २,४१,७४० रू चा मुद्देमाल जप्त करून त्यांचे विरुद्ध कार्यवाही केलेबाबत
पोलीस आयुक्तालय हद्दीत ०५ ठिकाणी जुगार कार्यवाही करून २८ आरोपी कडून २,४१,७४० रू चा मुद्देमाल जप्त करून त्यांचे विरुद्ध कार्यवाही केलेबाबत
दिनांक २७/०७/२०२६ रोजी
अमरावती आयुक्तालाय हद्दी मध्ये गुन्हे शाखेचे विविध पथक पेट्रोलिंग करीत असताना त्यांना मिळालेल्या गुप्त माहिती वरून
*अमरावती जिल्ह्यातील पोलीस स्टेशन वलगाव हद्दीतील
ग्राम साहूर येथे एकुण 22 आरोपीतावर एक्का बादशा नावाच्या पैशाचे हारजितीच्या जुगारावर रेड केली त्यांच्याकडून एकुण 2,33,200 /- रुपयाचा मुद्देमाल मिळुन आल्याने तो पंचासमक्ष जप्ती पंचांनाम्याप्रमाणे जप्त करण्यात आला असुन नमुद 22 आरोपी विरुद्ध पो.स्टे वलगाव येथे कलम 4,5 महाराष्ट्र जुगार कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस स्टेशन फ्रेझरपुरा
आरोपी नामे:- 1)शेखर संजय गडलिंग वय 28 रा राहुल नगर, अमरावती 2) सागर गजानन पवार वय 31 रा.लोणी ता नांदगाव खडेश्वर जि अमरावती हे शुक्रवार बाजार येथील सार्वजनिक ठिकाणी वरली जुगारच्या चिट्ट्यासह हार जीत चा खेळ खेळताना मिळून आल्या वरून त्यांच्याकडून नगदी 2200 रु व पेन कि. अ.20 रु असा एकूण 2220* /- रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपी नामे:- 1)रवींद्र भीमरावजी वाकोडे वय 50 वर्ष रा गोपालपूर ता जि अमरावती 2) सुरज सिंग कैलास सिंग चंदेल वय 37 रा.कमल कॉलनी अमरावती हे यशोदा नगर येथील सार्वजनिक ठिकाणी वरली जुगारच्या चिट्ट्यासह हार जीत चा खेळ खेळताना मिळून आल्या वरून त्यांच्याकडून नगदी 3000 रु व पेन कि. अ.20 रु असा एकूण 3020* /- रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याचा विरुद्ध पो.स्टे फ्रेजरपुरा येथे कलम 12(अ ) जुगार कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला.
पोस्टे गाडगे नगर
आरोपी नामे:- 1) सिद्धार्थ सुरेश रोकडे राहणार सिद्धार्थ नगर येथील सार्वजनिक ठिकाणी वरली जुगारच्या चिट्ट्यासह खेळ खेळताना मिळून आल्या वरून त्यांच्याकडून नगदी 1480 रु व पेन कि. अ.20 रु असा एकूण 1500* /- रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याचा विरुद्ध पो.स्टे गाडगे नगर येथे कलम 12(अ ) जुगार कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला.
पोस्टे नागपुरीगेट
आरोपी नामे:- 1) सय्यद शकील सय्यद यासीन वय 42 वर्ष राहणार फातिमानगर हा अकबर नगर नाल्याजवळील सार्वजनिक ठिकाणी वरली जुगारच्या चिट्ट्यासह खेळ खेळताना मिळून आल्या वरून त्यांच्याकडून नगदी 1800 रु व जुगाराच्या साहित्यासह मिळून आल्याने मुद्देमाल जप्त करून त्याचा विरुद्ध पो.स्टे नागपुरी गेट येथे कलम 12(अ ) जुगार कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला.पुढिल तपास सुरू आहे जिल्हा प्रतिनिधी -कैलास वाकपांजर

