कन्नड “कंत्राटदार आणि अधिकारी यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ” राष्ट्रवादी महिला जिल्हा अध्यक्ष, सौ. स्वाती ताई कोल्हे
कन्नड प्रतिनिधी: रायभान साळवे
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 धुळे-सोलापूर येथून कन्नड शहरा मध्ये प्रवेश करणार्या उड्डाण पुलाचे बांधकाम अपूर्ण असून वेळेत पूर्ण झाले नाही, तिथली सुरक्षा देखील अपुरी असल्यामुळे येथे. नेहमीच काही ना काही अपघात होत च असतात. या महामार्गावर आतापर्यंत 30 ते 32 प्रवाशांचा अपघात झाला असून काही जिवानिशी गेले आहेत. या अपघातांना कंत्राटदारास जवाबदार धरून त्याच्यावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा या आणि इतर मागण्यांसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला जिल्हा अध्यक्ष स्वाती ताई कोल्हे यांनी यांनी रास्ता रोको आंदोलन केले.
या आंदोलनात डॉ. सदाशिव पाटील, श्री अशोक दापके,भाजपा च्या महिला तालुकाध्यक्ष वर्षा लहाने, उद्धव सेनेचे उप तालुका प्रमुख नवनाथ राठोड,
या आंदोलनामुळे वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या,
या वेळी सहायक पोलीस अधीक्षक अपराजिता अग्निहोत्री यांनी महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकारी यांच्या शी भेट घडवून आणण्याची आंदोलकांना आश्वासन दिले.
या वेळी शेकडो नागरिकांनी यात भाग घेतला.
पोलीस अधीक्षक अपराजिता अग्निहोत्री यांना निवेदन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
