सततच्या नापिकिने घेतला आणखी एका शेतकऱ्याचा बळी

0
download

अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यात पांढरी खानापूर येथील शेतकरी बाळकृष्ण किसनराव काळे वय वर्षे 55 यांनी आज दिनांक 30/09/2026 गुरुवारी सकाळच्या सुमारास अनुपमा सुरज कोकाटे यांच्या शेतातील फणसाच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपविली गेल्या 8 ते 10 वर्षांपासून किरण रावसाहेब कोकाटे यांचे 5 एकर शेत लागवन ने करत होते दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील ऐन हंगामाच्या वेळी पावसाने दडी मारल्यामुळे त्यांना नापीकीचा सामना करावा लागला सततची नापिकी व नापीकीमुळे थकीत असलेले कर्ज या मुळे कंटाळून त्यांनी गळफास घेऊन त्यांनी आपली जीवन यात्रा संपविली सरकारच्या कर्जमाफीच्या घोषणा आणखी कीती निष्पाप बळीराजाचा जिव घेऊन उंटावरून शेळ्या राखण्याचे काम करणार असा सवाल पांढरी गावासह संपूर्ण राज्यात हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना पडला आहे,आता प्रश्न आहे नापिकीमुळे जिवनयात्रा संपविणार्या पिडित शेतकरी कुटुबाला शासन आर्थिक मदत काय करणार,कि मेलेला शेतकरी पुन्हा जिवंत करून देणार हा गंभीर प्रश्न कुटुंबा सह पंचक्रोशीतील शेतकरी वर्ग शासनाला विचारत आहे बाळकृष्ण किसनराव काळे यांच्या टोकाच्या भुमिकेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे त्यांच्या पश्चात एक मुलगा व पत्नी असा परिवार आहे. जिल्हा प्रतिनिधी -कैलास वाकपांजर

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed