कुणाचा ठेका सरस, कुणाचे सूर अव्वल; ‘जल्लोष लोककले’त बालप्रतिभेचा रंग!
“सिद्धेश्वर विद्यालय जिंतूर व बाल विद्या मंदिर परभणी सर्वोत्कृष्ट”
महाराष्ट्र,परभणी/प्रतिनिधी :- रमेश मुलगीर
बालरंगभूमी परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जल्लोष लोककलेचा या कार्यक्रमात समूह नृत्य स्पर्धेत सिद्धेश्वर विद्यालय जिंतूरने तर समूह गायन स्पर्धेत बालविद्या मंदिर नानाल पेठ परभणी यांनी अंतिम स्पर्धेत मजल मारली आहे.
रविवारी सकाळी साडेनऊ वाजता स्पर्धेचे उद्घाटन जिजाऊ ज्ञानतीर्थ चे मार्गदर्शक रामरावजी लोहट दादा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बालरंगभूमी यांचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी रामरावजी लोहट यांनी स्पर्धेसाठी आलेल्या सर्व कलावंतांना शुभेच्छा दिल्या व प्रत्यक्ष स्पर्धेला सुरुवात झाली. रात्री उशिरा या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला पारितोषिक वितरणासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक मिलिंद बामणीकर प्राध्यापक संजय गजमल अरविंद शहाणे यांच्यासह बाल रंगभूमीचे अध्यक्ष आबा ढोले उपाध्यक्ष नितीन लोहट उपेंद्र दुधगावकर त्र्यंबक वडसकर यांची उपस्थिती होती संपूर्ण दिवसभराच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी दामुके अनिकेत शेंडे प्राध्यापक किशोर विश्वामित्रे मनीषा उमरीकर राजू वाघ संदीप राठोड प्रकाश बारबिंड यांनी केले.
डॉ. अर्चना चिक्षे, संजय पांडे, प्रमोद बल्लाळ, नागेश कुलकर्णी, मनीषा उमरीकर, निर्मला वडसकर, सचिन आढे, प्रकाश बारबिंड, दिनकर देशपांडे,रामदास कदम, कुलदीपक उंडाळकर, सौरभ वडसकर, सुरेश भिसे, अर्जुन भिसे, दिगंबर गडगीळे, रामजी तळेकर, कौशल पामे यांच्यासह सर्व बालरंगभूमी परिषदेच्या सभासदांनी व जिजाऊ ज्ञानतीर्थ च्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
पाचही गटात सर्वोत्कृष्ट पारितोषिक मिळालेले विजेते आता महाअंतिम फेरीत लातूर येथे 2 ऑक्टोबर रोजी परभणी जिल्हयाचे प्रतिनिधित्व करतील.
स्पर्धा निकाल पुढील प्रमाणे : –
१) समूहनृत्य स्पर्धा :
◆ सर्वोत्कृष्ट- सिद्धेश्वर विद्यालय जिंतूर
◆ उत्कृष्ट गांधी विद्यालय कृषी सारथी शाखा परभणी
◆ उत्तम – नृसिंह विद्यामंदिर पोखर्णी नृसिंह
◆ प्रशंसनीय 1ओयासीस इंग्लिश स्कूल परभणी
◆ प्रशंसनीय जिजाऊ ज्ञानतीर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पाथरी रोड परभणी
२) एकलनृत्य स्पर्धा :
◆ सर्वोत्कृष्ट- स्वरा काळे
◆ उत्कृष्ट – आंचल राठी
◆ उत्तम आराध्या साठे
◆ प्रशंसनीय 1 माया दुधवडे
◆ प्रशंसनीय 2 अनन्या गायकवाड
३) समूह गायन स्पर्धा :
◆ सर्वोत्कृष्ट- बाल विद्यामंदिर नानलपेठ परभणी
◆ उत्कृष्ट कै. रावसाहेब जामकर विद्यालय प्राथमिक
◆ उत्तम : कै. रावसाहेब जामकर विद्यालय माध्यमिक परभणी
◆ प्रशंसनीय 1 एन व्ही एस मराठवाडा हायस्कूल परभणी
◆ प्रशंसनीय 2 नृसिंह माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय
४ ) एकल गायन :
◆ सर्वोत्कृष्ट- स्वरा पाथरकर
◆ उत्कृष्ट – अनुष्का वाघ
◆ उत्तम – स्वराज परांडे
◆ प्रशंसनीय 1 श्रद्धा मोरे
◆ प्रशंसनीय 2 सिद्धी आल्हाट
५) एकल वादन
◆ सर्वोत्कृष्ट – कार्तिक सांगळे
◆ उत्कृष्ट आनंद राऊत
◆ उत्तम स्वराज परांडे
◆ प्रशंसनीय 1 श्रेयस कदम
◆ प्रशंसनीय 2 शौनक दुधगावकर
