कन्नड “स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कन्नडमध्ये “टाळे ठोको” आंदोलन ” कन्नड प्रतिनिधी :रायभान साळवे

0
download

कन्नड येथील पाणपोई टमाटे मार्केट मधील शेतकर्‍यांच्या 1 कोटी पेक्षा जास्त थकबाकी साठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे, त्यासाठी ती थकबाकी मिळवून देण्यासाठी आज दिनांक 28/9/2026 रोजी बाजार समितीला टाळे ठोकून आंदोलन केले.
सुमारे एक वर्षापासून शेतकर्‍यांच्या थकबाकी थकविन्यास व्यापारी जवाबदार आहेत, ती वसूल करण्याची जबाबदारी बाजार समितीची आहे पण आता पैसे मागायला गेलो की पाणपोई येथील मार्केट खाजगी आहे त्याचा आणि आमचा काही एक संबंध नाही असे उत्तर दिल्या जाते.

शेतकर्‍यांच्या प्रमुख मागण्या

1)शेतकर्‍यांच्या घामाचे पैसे बुडविण्या ला बाजार समितीने पाठीशी घालू नये.
2)आता येणाऱ्या हंगामात खाजगी मार्केट बंद करून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नियोजनात टमाटे मार्केट चालू करावे.
3) व्यापाऱ्यांची मनमानी बंद करून शेतकऱ्यांना मदत करावी दुष्काळ असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे त्यामुळे समितीने आपली जवाबदारी ओळखून. तातडीने निर्णय घ्यावा. जर हे होत नसेल तर जिल्हा उपनिबंधक यांनी बाजार समितीच्या संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासका ची नेमणूक करावी.
4) एक कोटी रुपयांची थकबाकी का दिली गेली नाही याची चौकशी करावी.
जर का असे झाले नाही तर विभागीय कार्यालय येथे आंदोलन करण्यात येईल.
असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृष्णा जिल्हा अध्यक्ष कृष्णा साबळे यांनी सांगितले या आंदोलनात कृषी भूषण भाऊसाहेब थोरात, मराठवाडा संघटक दिनकर पवार, तालुकाध्यक्ष प्रकाश बोरसे, पक्ष तालुकाध्यक्ष रामेश्वर भुसारी, शिवाजी बचाटे, राजू बोगाने,दीपक शेजवळ, गणेश भोसले, निसार पठाण, नंदकुमार काळे, वाल्मिक शिरसे,सचिन गायके आणि शेकडो शेतकरी यांच्या हजेरी त बाजार समिती ला टाळे ठोकण्यात येणार आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed