पदवीधरांच्या हक्कासाठी लढ्याचा निर्धार! नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदवीधर संघाचे उमेदवार श्री. अभिजित गोविंदराव वंजारी यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी आमदार श्री. रामदासजी मसराम यांनी उपस्थित राहून श्री. अभिजित वंजारी यांना शुभेच्छा दिल्या. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर जवाहर विद्यार्थी गृह, सिव्हिल लाइन्स येथे आयोजित सभेत त्यांच्या प्रचाराचा अधिकृत शुभारंभ करण्यात आला.
पदवीधरांचे प्रश्न, त्यांचे हक्क आणि त्यांच्या अपेक्षांना न्याय मिळवून देण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. पदवीधर बांधवांच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. श्री. हर्षवर्धनजी सपकाळ, माजी विरोधी पक्षनेते तथा आमदार मा. श्री. विजयजी वडेट्टीवार, माजी मंत्री श्री. सुनीलजी केदार, माजी मंत्री मा. श्री. राजेंद्रजी मुळक, माजी मंत्री मा. श्री. रणजितदादा कांबळे, लोकसभा खासदार नामदेव किरसान, लोकसभा खासदार मा. श्री. प्रशांतजी पडोळे, लोकसभा खासदार मा. श्री. शामकुमार बर्वे, पश्चिम नागपूर विधानसभा आमदार मा. श्री. विकासजी ठाकरे, आमदार सुधाकर अडबाले, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते मा. श्री. अतुल लोंढे, महासचिव मा. श्री. गिरीशजी पांडव, मा. श्री. संजयजी महाकाळकर तसेच नागपूर जिल्हाध्यक्ष मा. श्री. सलील देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
पदवीधरांचा आवाज बुलंद करण्यासाठी…
प्रश्नांसाठी, हक्कांसाठी आणि न्यायासाठी!
————————-
गडचिरोली सबादाता आशिफ़ कुरेशी

