नांदेड/ हदगाव अतुल राऊतराव हदगावमध्ये चोरट्यांची पुन्हा सलामी
हदगाव शहरात चोरीच्या घटनांना आळा बसताना दिसत नाही. दहा-पंधरा दिवसांपूर्वी दुकाने फोडून लाखोंचा माल लंपास करणारे चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले होते. त्या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच आता पोलीस निरीक्षक स्वतः वास्तव्यास असलेल्या कमलाईनगर परिसरात पुन्हा चोरट्यांची हालचाल समोर आली आहे.
४ आणि ५ ऑक्टोबरच्या मध्यरात्री एक ते दीड वाजण्याच्या सुमारास सुमारे पाच चोरटे कमलाईनगर परिसरात फिरताना सीसीटीव्हीत दिसून आले. त्यांनी काही घरांमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या हाती काही लागले की नाही, याची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.
या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, रात्रीची गस्त वाढवून सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा तातडीने शोध घ्यावा, अशी मागणी होत आ
मागील चोरीचा तपास सुरू असतानाच संवेदनशील परिसरात चोरट्यांची पुन्हा झालेली हालचाल पोलिसांसाठी आव्हान ठरली आहे. त्यामुळे हदगाव शहरातील चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून ठोस कारवाईची अपेक्षा नागरीकाकडुन व्यक्त होत आहे.
