*मानवत तालुक्यामध्ये 70 टक्के पंचनामे पूर्ण*
*मानवत तालुक्यामध्ये 70 टक्के पंचनामे पूर्ण*
“तहसीलदार पांडुरंग माचेवाड
परभणी/प्रतिनिधी :-रमेश मुलगीर
परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार मानवत तालुक्यामध्ये नैसर्गिक आपत्ती अनुषंगाने खरीप हंगाम 2026. 27 च्या प्रथम ( ट्रिगल )कळ लागू झालेल्या मानवत तालुक्यामध्ये पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम ग्रामस्तरीय कर्मचाऱ्यामार्फत सुरू आहे. उपविभागीय अधिकारी पाथरी व तहसीलदार मानवत यांनी नैसर्गिक आपत्ती अनुषंगाने पीक नुकसान,पाणीटंचाई चारा टंचाई बाबत तालुक्यातील विभाग प्रमुख, ग्राम महसूल अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी यांच्या बैठका घेऊन त्यांना वरील काम करण्यासाठी योग्य त्या सूचना दिल्या. मानवत तालुक्यामध्ये आजपर्यंत जवळपास 67 ते 70 टक्के नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे पूर्ण झाले असून पंचनामा करण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरू आहे. परंतु काही गावांमधून स्थानिक कर्मचाऱ्यांना पीक नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी विरोध होत असल्याचे दिसून येत असून पंचनामे न करता सरसकट पूर्ण शेतकऱ्यांचे पूर्ण क्षेत्रा साठी मदत देणे बाबत मागणी होत आहे.
उपविभागीय अधिकारी पाथरी यांनी पाणीटंचाई व चारा टंचाई बाबत तालुक्याचे गटविकास अधिकारी व पशुसंवर्धन विभागाच्या अधिकारी यांना माहिती देण्याच्या व त्यावर योग्य ते उपाययोजना करण्याच्या सूचना दिनांक एक ऑक्टोबरच्या बैठकीमध्ये दिलेल्या आहेत. मानवत तालुक्यातील पीक नुकसान चारा टंचाई पाणी टंचाई यावर प्रशासनाचे लक्ष असून योग्य ती खबरदारी घेत आहे.
