अकोला रिपोर्ट गणेश वाडेकर चाणक्य न्यूज़ चैनल

0
download

मनपाव्दारा “सेवा संकल्प अभियान” अंतर्गत मालमत्ता हस्तांतरण शिबीराचे आयोजन.
अकोला दि. 06 ऑक्टोंबर 2026 – “सेवा संकल्प अभियान” अंतर्गत दि. 5 ऑक्टोंबर 2026 रोजी मनपा आयुक्त डॉ.सुनिल लहाने यांच्या आदेशान्वये तसेच सहा.आयुक्त गणेश शहाणे यंच्या मार्गदर्शनात मालमत्ता कर व बाजार परवाना वसुली विभागाव्दारे अकोला महानगरपालिका अंतर्गत असलेल्या उत्तर झोन कार्यालयामध्ये मालमत्ता हस्तांतरण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराच्या माध्यमातून लाभ घेणा-या मालमत्ता धारकांनी प्रशासनाच्या या कामाबद्दल समाधान व्यक्त केले.
या शिबीराचे आयोजन कर अधिक्षक नंदिनी दामोदर यांचे मार्गदर्शनात व उपस्थितीत पार पडले असून यावेळी सहा.कर अधिक्षक पंकज जोगळेकर, कर वसुली लिपिक दिलावर खान, मो.नदीम खान शे. नजीर, शंकर शर्मा, हरिदास गजभिये, ईश्वर नरडे, अरविंद पांडे, योगेश पागृत, मोहन घाटोळ, राजानंद मेश्राम, बाबर यांचेसह त्या भागातील नागरिकांची उपस्थिती होती.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed