गंगाखेडच्या दुष्काळग्रस्त भागात शेतकऱ्यांचे अश्रू अनावर;

0
download

“महादेव जानकरांनी जाणून घेतल्या व्यथा
शेतकऱ्यांच्या संकटाच्या यातना सांगताना भावूक झाले अन्नदाता; जानकरांनी दिला मायेचा आधार व विश्वास”

बेरोज़गार युवक-युवतियों के लिए रोज़गार के अवसर लार्ड बुद्धा पी.जी. कॉलेज रूपईडीहा में आयोजित होगा वृहद रोज़गार मेला निजी क्षेत्र की 20 से अधिक प्रतिष्ठित कंपनियां होंगी शामिल

परभणी/प्रतिनिधी :- रमेश मुलगीर

परभणी जिल्ह्यात यंदा पावसाने ओढ दिल्याने अनेक भागांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. खरीप हंगामातील पिकांना पावसाअभावी मोठा फटका बसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेवजी जानकर साहेब यांनी परभणी जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला.
गंगाखेड तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करताना जानकर यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या अडचणी, पिकांची परिस्थिती तसेच पावसाअभावी झालेल्या नुकसानीची माहिती जाणून घेतली. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा सांगताना गेल्या काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिकांची झालेली अवस्था आणि त्यातून निर्माण झालेल्या आर्थिक संकटाची माहिती दिली.
“संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी कोण उभे राहणार?” या भावनेतून शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. कर्ज, वाढता उत्पादन खर्च, पिकांचे नुकसान आणि बाजारातील अनिश्चितता यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. या व्यथा सांगताना काही शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले. शेतकऱ्यांच्या डोळ्यांत आलेले अश्रू पाहून उपस्थितांचेही मन हेलावून गेले.
यावेळी महादेवजी जानकर यांनी शेतकऱ्यांच्या भावना समजून घेत त्यांना धीर दिला. संकटाच्या काळात शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, त्यांच्या प्रश्नांसाठी आपण आवाज उठवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांच्या समस्या केवळ कागदोपत्री न राहता शासनाने प्रत्यक्ष मदत करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
गंगाखेड तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करताना शेतकऱ्यांच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू हे केवळ एका कुटुंबाचे दुःख नसून संपूर्ण शेतकरी समाजाच्या वेदनेचे चित्र असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. शेतकऱ्यांना तातडीने मदत, पीक नुकसानीचे पंचनामे आणि योग्य नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
महादेवजी जानकर यांच्या या पाहणीमुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांना पुन्हा एकदा वाचा फुटली असून, शासनानेही या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन शेतकऱ्यांना तातडीने दिलासा द्यावा, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed