वर्धा स्लग . . दुष्काळग्रस्त पिकाची पाहणी करण्यासाठी कृषी विभागाचे पथक बांधावर

0
download

वेळा इंझाळा येथे पिकांचे नुकसान – जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी केली शेतात जाऊन पाहणी

अँकर . .मौजा वेळा व इन्झाळा येथे दुष्काळामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा कृषी विभागाचे अधिकारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन दुष्काळी परिस्थितीची व पिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या.
या पाहणी दौऱ्यात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अरविंद उपरीकर, तालुका कृषी अधिकारी हिंगणघाट सचिन सुतार, मंडळ कृषी अधिकारी अल्लीपूर शुभ्रकांत भगत, उप कृषी अधिकारी राजू कुमरे, सहाय्यक कृषी अधिकारी पंकज चौधरी, कृषी सहाय्यक अंकुश सायकार यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
जिल्हा अधीक्षक अरविंद उपरीकर यांनी शेतकऱ्यांना धीर देत, झालेल्या नुकसानीचा अहवाल शासनाला पाठवून लवकरात लवकर मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. तसेच पीक विमा व ई-पीक पाहणी बाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी शेतकऱ्यांनी देखील आपल्या व्यथा अधिकाऱ्यांसमोर मांडल्या.

प्रतिनिधी
सतीश काळे
वर्धा

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed