शेतकऱ्यांच्या बांधावर उतरले महादेव जानकर; ‘हेक्टरी १ लाख द्या!’
दावरवाडीत कापूस पिकाच्या नुकसानीची पाहणी; बळीराजाच्या हक्कासाठी सरकारला धारेवर धरण्याचा इशारा
पैठण | अविनाश गर्डे
अस्मानी संकटाने कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला असताना राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. पैठण तालुक्यातील दावरवाडी येथे त्यांनी कापूस पिकाच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. यावेळी “संकटात सापडलेल्या बळीराजाला शासनाने वाऱ्यावर सोडू नये; तातडीने हेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी,” अशी आक्रमक मागणी त्यांनी केली.
दुष्काळाच्या झळा, पिकांची झालेली नासाडी आणि उत्पादनातील मोठी घट यामुळे कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटाच्या गर्तेत सापडला आहे. शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन त्यांनी पिकांची अवस्था पाहिली. कागदावरील आकडे नव्हे, तर बांधावरची वस्तुस्थिती समजून घेण्यासाठी जानकर यांनी थेट शेतकऱ्यांशी संवाद साधला.
——————————————–
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांना पत्र
दावरवाडीतील पाहणी दौऱ्यानंतर शेतकऱ्यांच्या विविध न्याय्य मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र देणार असल्याचे महादेव जानकर यांनी स्पष्ट केले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळावी, पंचनामे पारदर्शक पद्धतीने व्हावेत आणि शासनाने शेतकऱ्यांच्या नुकसानीची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी भूमिका त्यांनी मांडली.
“बळीराजाच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी शासनाने तातडीने मदतीचा हात पुढे करावा. शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत राष्ट्रीय समाज पक्षाचा लढा थांबणार नाही,” असा निर्धार जानकर यांनी व्यक्त केला.
——————————————–
‘बांधावरचा आक्रोश’ सरकारपर्यंत पोहोचणार
शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन त्यांच्या समस्या ऐकून घेतल्याने दावरवाडी परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केवळ चर्चा न करता प्रत्यक्ष बांधावर उतरून लढा देण्याची भूमिका राष्ट्रीय समाज पक्षाने घेतल्याचे यावेळी स्पष्ट झाले.
या पाहणी दौऱ्यावेळी अजित दादा पाटील , माऊली नाना सलगर , ओमप्रकाश चितळकर , अश्रुबा कोळेकर , प्रकाश दिलवाले , अशोक सरगर ,कृष्णा जाधव , भाऊसाहेब सोनवणे , संतोष सोनवणे , शिवाजी जाधव , सचिन जाधव , किशोर जाधव , गणेश भुजबळ , महेश दिलवाले , सोपान महालकर , ओमकार राजळे , रामेश्वर सोरमारे , दत्ता चोरमारे , दत्ता दिवटे , मीठू चोरमले , मिठू नन्नवरे , गोपाल धारे , शेखर धारे , विष्णू सोरमारे , अंबादास खोलासे , किशोर डोईफोडे , यांच्या सह अनेक शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मिठ्ठु ननावरे, मिठ्ठु चोरमारे, अशोक सरगर, विष्णू चोरमारे, गोपाल धारे, शेखर धारे यांच्यासह शेतकरी, कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते
