ऑपरेशन प्रहार अंतर्गत… अकोला स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; अवैध गोवंश तस्करीला आळा घालत ०९ गोवंशीय जनावरांना जीवदान….
ऑपरेशन प्रहार अंतर्गत… अकोला स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; अवैध गोवंश तस्करीला आळा घालत ०९ गोवंशीय जनावरांना जीवदान….
अकोला रिपोर्ट गणेश वाडेकर चाणक्य न्यूज़
मा. अर्चित चांडक, पोलीस अधीक्षक, अकोला यांच्या प्रहार मोहिमेअंतर्गत आज दिनांक ०७/१०/२०२६ रोजी सकाळी स्थानिक गुन्हे शाखा, अकोला व पोलीस स्टेशन रामदासपेठ यांनी संयुक्त कारवाई केली.
दिनांक ०७/१०/२०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे, मच्छी मार्केट ताजनापेठ परिसरात छापा टाकण्यात आला. त्या ठिकाणी काही इसमांनी ९ गोवंश जातीच्या जनावरांना कत्तलीच्या उद्देशाने त्यांचे पाय व तोंड दोरीने घट्ट बांधून ठेवल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तत्परता दाखवत सर्व जनावरांच्या अंगावरील दो-या सोडवून त्यांची सुटका केली.
सदर कारवाईत अंदाजे २,१५,००० रुपये किंमतीचे ९ गोवंश जनावरे हस्तगत करण्यात आली असून, जनावरांना वैद्यकीय तपासणी व सुरक्षेसाठी गोशाळेत पाठवण्यात आले असुन आरोपी शेख हुसेन शेख मुरसा (वय ५५ वर्षे, रा. खिडकी पुरा, जुने शहर, अकोला) याच्याविरुद्ध पोलीस स्टेशन रामदासपेठ येथे महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा कलम ५ (अ), ५ (ब), ९ व प्राण्याचा छळ प्रतिबंधक अधिनियम कलम ११ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
