कन्नड “विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुखरूप सुटका ” कन्नड प्रतिनिधी:रायभान साळवे

0
download

कन्नड तालुक्यातील आडगाव (जेहूर )येथील शेतकरी ज्ञानेश्वर निकम यांच्या शेतातील गट न. 61 मधल्या विहिरीत एक मादी जातीचा बिबट्या पडला आहे अशी माहिती ग्रामस्थांनी वनविभागातील अधिकार्‍यांना दिली.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे बचाव पथक तातडीने घटनास्थळी रवाना झाले. विहिरीत उतरलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यासाठी पिंजरा विहिरीच्या आत सोडण्यात आला, त्या पिंजर्‍याच्या सहाय्याने बिबटय़ा ला सुखरूप बाहेर काढण्यात वनविभागाच्या कर्मचार्‍यांना यश आले, त्यानंतर बिबट्याची पशुवैद्यकीय तपासणी करून अधिवासात सोडण्यात आले.
ही घटना दिनांक 10 रोजी सकाळी श्री. निकम शेतात गेल्यानंतर उघडकीस आली.
या मोहिमेत स्थानिक नागरिकांनी पण कर्मचार्‍यांना मोलाचे सहकार्य केले,
बचाव पथकांमध्ये छ.संभाजीनगर येथील प्रादेशिक वन विभागाचे वनसंरक्षक प्रमोद लाकरा,उपवनसंरक्षक सुवर्णा माने सहायक विशाल कवडे, यांच्या नेतृत्वाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी शिवाजी टोमपे,यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. या मोहिमेत संजय कादी,देवीदास राठोड, शेख मकसद सईद भाऊसाहेब वाघ, रामेश्वर राठोड, गावकरी लक्ष्मण निकम,उपसरपंच राहूल सोनवणे, योगेश शिंदे ,सोपान निकम ,कल्याण गायकवाड़ किशोर बहीरव आणि बर्‍याच नागरिकांनी मोलाचे सहकार्य केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed