ब्रेकिंग न्यूज | अकोल्यात निवासी इमारत कोसळली! अकोला रिपोर्ट गणेश वाडेकर चाणक्य न्यूज़ चैनल अकोला: शहरातील खोलेश्वर रोड, राजपूतपुरा परिसरात आज सकाळी मोठी दुर्घटना घडली आहे.

0
download

प्रभाग क्रमांक १२ मधील राजपूतपुरा परिसरात आज सकाळी सुमारे ६ वाजता एक निवासी इमारत अचानक कोसळली. या दुर्घटनेत भाडेकरू प्रमोद पांडे यांच्या कुटुंबातील सदस्य ढिगाऱ्याखाली दबले गेले.

घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत ढिगाऱ्याखालून कुटुंबीयांना बाहेर काढले. सुदैवाने या घटनेत मोठी जीवितहानी टळली असून, प्राथमिक माहितीनुसार एका मुलीला किरकोळ दुखापत झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच सिटी कोतवाली पोलीस आणि महापालिका प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या शेजारी पाडकाम सुरू असल्याची माहिती मिळत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed