श्री नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते शमी वृक्ष लागवडीचा शुभारंभ! “महाराष्ट्रातील प्रत्येक गाव, मंदिर, मठ आणि घराघरात शमी वृक्ष लावण्याचा संकल्प”

0
download

सोनपेठ, दि. ११
परभणी/प्रतिनिधी :- रमेश मुलगीर

ग्रीन इंडिया चॅलेंजच्या वतीने महाराष्ट्रातील प्रत्येक गावात धार्मिक व पर्यावरणीय महत्त्व असलेल्या शमी वृक्षाच्या लागवडीची मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत महाराष्ट्रातील शमी वृक्ष लागवडीचा शुभारंभ नंदिकेश्वर मठ संस्थान, सोनपेठ येथे श्री नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शमी वृक्षाची लागवड करून करण्यात आला.
ग्रीन इंडिया चॅलेंजच्या वतीने गेल्या नऊ वर्षांत वीस कोटींहून अधिक वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. यावर्षी ग्रीन इंडिया चॅलेंजच्या नवव्या आवृत्तीचा शुभारंभ महाराष्ट्रात दि. २४ जुलै रोजी गोदावरी नदीच्या काठावर दोन हजार बांबूच्या रोपांची लागवड करून करण्यात आला आहे. ग्रीन इंडिया चॅलेंजच्या वतीने महाराष्ट्रात एक कोटी वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प संस्थापक श्री जे. संतोषकुमार यांनी केला आहे.
याच उपक्रमांतर्गत धार्मिक, सांस्कृतिक व पर्यावरणीय महत्त्व असलेल्या शमी वृक्षाची लागवड महाराष्ट्रातील प्रत्येक गावात श्री जे. संतोषकुमार यांच्या नेतृत्वाखाली आणि श्री राघव संजीव यादव यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणार आहे. शमी वृक्षाची लागवड महाराष्ट्रातील प्रत्येक गावात, मंदिरात, मठात आणि घराघरात केली जाणार आहे.
या राज्यव्यापी वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर नंदिकेश्वर मठ येथे ‘महाराष्ट्र वीरशैव लिंगायत शिवाचार्य महासभे’चे राज्याध्यक्ष श्री नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमास ग्रीन इंडिया चॅलेंजचे महाराष्ट्र समन्वयक सुधीर बिंदू, मुख्याध्यापक माणिक निलांगे, प्रदीप गायकवाड, राजकुमार धाबडे, शेतकरी नेते विश्वंभर गोरवे, पत्रकार सोमनाथ नागुरे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
ग्रीन इंडिया चॅलेंजच्या शमी वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ श्री नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवर.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed