अकोला: वाहतूक पोलिसांची कारवाई, तीन संशयितांकडून ६३ कुदळी जप्त अकोला रिपोर्ट गणेश वाडेकर चाणक्य न्यूज़
अकोला: पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या सूचनेनुसार वाहतूक पोलिसांनी शहरात नाकाबंदी दरम्यान मोठी कारवाई केली आहे.
नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली असून त्यांच्याकडून ६३ लोखंडी कुदळी, एक दुचाकी आणि एकूण ६२,६०० रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे.
पोलिस पुढील तपास करत आहेत.
