अकोला :मूर्तिजापूर तालुक्यात युवकाला बेदम मारहाण; किरकोळ वादातून हल्ला
अकोला रिपोर्ट गणेश वाडेकर चाणक्य न्यूज़
मूर्तिजापूर: तालुक्यातील मोहखेड येथे किरकोळ वादातून एका २५ वर्षीय युवकाला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शाब्दिक वादातून विशाल रवींद्र बोपुलकर (वय २५) याला लोखंडी रॉड आणि काठ्यांनी मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात विशाल गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या प्रकरणी पवन जोगदंड, ओम जोगदंड आणि नितेश जोगदंड यांच्यावर मारहाण केल्याचा आरोप आहे.
घटनेचा पुढील तपास मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस करीत आहेत.
