मानवत शहरात धाडसी चोरी; देवदर्शनावरून परतणाऱ्या महिलेचे दोन तोळ्यांचे मिनी गंठण लांबवले अज्ञाताने दुचाकीवरून येऊन मारला डल्ला; मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र,परभणी/प्रतिनिधी :- रमेश मुलगीर
परभणी जिल्ह्यातील मानवत शहरातील रचना कॉलनी परिसरात राहणाऱ्या एका महिलेचे दोन तोळ्यांचे सोन्याचे मिनी गंठण अज्ञाताने हिसकावून चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना ११ ऑक्टोबर रोजी घडली असून, या प्रकरणी १३ ऑक्टोबर रोजी मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटना काय घडली?
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, मानवत शहरातील रचना कॉलनी भागातील रहिवासी स्वाती महेश कुटे या ११ ऑक्टोबर रोजी देवदर्शनासाठी शहरातील मंदिरात गेल्या होत्या. देवदर्शन करून घरी परत येत असताना महाराणा प्रताप चौकातील पाळोदी रोड परिसरात निळ्या रंगाचा शर्ट घातलेला एक अज्ञात इसम होंडा शाईन (Honda Shine) दुचाकीवरून त्यांच्या जवळ आला. त्या अज्ञात इसमाने स्वाती कुटे यांच्या गळ्यातील सुमारे दोन तोळ्यांचे सोन्याचे मिनी गंठण हिसकावून पळ काढला.
पोलीस तपास सुरू
या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेचा पुढील अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल खिल्लारे हे करत आहेत.
नागरिकांना व महिलांना पोलिसांचे आवाहन
दरम्यान, आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर महिलांनी बाहेर पडताना आपल्या मौल्यवान सोन्याच्या दागिन्यांची व वस्तूंची योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन मानवत पोलिसांकडून करण्यात आले आहे. तसेच परिसरात कोणताही संशयास्पद इसम अथवा हालचाल आढळून आल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक दर्शन शिंदे यांनी केले आहे.
पोलिस प्रशासना कडून असे आव्हान करण्यात येते की प्रत्येक जिल्ह्यात दुष्काळाचे सावट जाणवत आहे पाणी टंचाई चारा टंचाई तसेच सर्व बाबी लक्षात घेता जनतेने थोडे सावधगिरी बाळगावी बाजारात किंवा मार्केट मध्ये जात असताना मौल्यवान वस्तू सांभाळण्यात जसे की दागिने मोबाईल सारख्या वस्तू असे आव्हान मानवत चे पोलीस निरीक्षक दर्शन शिंदे यांनी केले आहे
