नांदेड / हदगाव – अतुल राऊतराव भागवत देवसरकर यांच्या कार्य अहवालाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन

0
download

नांदेड / हदगाव – अतुल राऊतराव

भागवत देवसरकर यांच्या कार्य अहवालाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन

नांदेड येथील श्रीराम नगर येथे भाजपाचे हदगाव पूर्व मंडल तालुकाध्यक्ष तथा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माजी कार्यकारी परिषद सदस्य भागवत देवसरकर यांच्या कार्य अहवालाचा प्रकाशन सोहळा उत्साहात पार पडला. माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण आणि राज्याचे जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते या कार्य अहवालाचे प्रकाशन करण्यात आले.

भागवत देवसरकर यांनी कार्यकारी परिषद सदस्य व भाजपा तालुकाध्यक्ष म्हणून केलेल्या कार्याचा आढावा या अहवालातून मांडण्यात आला आहे.

यावेळी खासदार अशोकराव चव्हाण यांनी देवसरकर यांच्या कार्याचे कौतुक करत भाजपाचे संघटन वाढवण्यासाठी त्यांचे योगदान उल्लेखनीय असल्याचे सांगितले.

तर जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी जनतेच्या प्रश्नांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचे सांगितले.

या सोहळ्याला खासदार डॉ. अजित गोपछडे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed