दि. १६/१०/२०२६ गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने मौजा राजाराम खांदला येथे आरोग्य शिबिराचे करण्यात आले आयोजन

0
download

* या शिबीरादरम्यान उपपोस्टे राजाराम खांदला हद्दीतील एकूण ६५ नागरिकांची तज्ञ वैद्यकीय पथकाकडून तपासणी
* पोलीस रुग्णालय गडचिरोली, जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली, जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आला उपक्रम
* आरोग्य शिबिरादरम्यान फिरत्या प्रदर्शनीच्या माध्यमातून शहीद जवानांचे बलिदान व पोलीस दलाच्या कार्याबरल करण्यात आली जनजागृती
* आरोग्य शिबिरादरम्यान नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ

गडचिरोली पोलीस दलाकडून जिल्ह्यातील नागरिकांसाठी वेळोवेळी विविध कल्याणकारी उपक्रम राबविले जात असतात. जिल्ह्यामधील अतिदुर्गम भागातील नागरिकांपर्यंत देखील आरोग्य सेवा पोहचविण्याच्या उद्देशाने गडचिरोली पोलीस दलाकडून विविध आरोग्य मेळावे आयोजित केले जात असतात. याच उपक्रमांचा एक भाग म्हणून गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने काल दिनांक १५ ऑक्टोंबर २०२६ रोजी पोलीस रुग्णालय गडचिरोली, जिल्हा सामान्य स्रणालय गडचिरोली, जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने मोजा राजाराम खांदला येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

अतिदुर्गम भागातील नागरिकांमध्ये आरोग्य सुविधांविषयी जनजागृती करून नागरिकांना विविध आरोग्य तपासणी आणि औषधोपचार मिळवून देण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली सदर आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये पोलीस खणालय गडचिरोलीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रोशनी किरंगे, श्री. प्रकाश दानव (औषधी निर्माण अधिकारी) कु. चारुलता दुर्गे (अधिपरिचारीका) यांच्या नेतृत्वात नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

सदर शिबिरादरम्यान हद्दीतील सुमारे ६५ नागरिकांची विविध आजारांबाबत तपासणी करून आवश्यकतेनुसार नागरिकांना मोफत औषधे उपलब्ध करून देण्यात आली तसेच विविध आजारांविषयी व पोषण समस्यांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी एकुण ०३ नागरिकांना आवश्यकतेनुसार विविध रुग्णलयाच्या ठिकाणी पुढील तपासणीसाठी शिफारस केलेली आहे. सदर आरोग्य शिबिरा दरम्यान नागरिकांना २० आभा कार्ड व १५ आयुष्यमान भारत कार्ड काढून देण्यात आले. तसेच आजपावेतो गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने सन २०२१ पासून एकूण २२४ आरोग्य मेळाव्यांच्या माध्यमातून जवळ-जवळ एकूण ५०,००० हजार पेक्षा अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी केलेली आहे. तसेच एकूण ०६ रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून एकूण ४,८६४ युनिट रक्ताचे संकलन करण्यात आले आहे. यासोबतच ऑपरेशन रोशनीच्या माध्यमातून एकूण ९,९७१ पेक्षा अधिक नागरिकांची नेत्र तपासणी करून एकूण १,४१२ नागरिकांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात

आलेली आहे. यासोबतच गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत असतांना शहीद जवानांनी दिलेल्या बलिदानाबद्दल, सी-६० जवानांच्या शौर्याबद्दल व नागरी कृती उपक्रमांबद्दल उपस्थित नागरिकांना विविध बॅनरच्या माध्यमातून माहिती देण्यात येऊन जनजागृती करण्यात आली.

सदर आरोग्य शिबिराचे आयोजन पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. एम. रमेश, मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. गडचिरोली श्री. सुहास गाडे, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी., अपर पोलीस अधीक्षक, अहेरी श्री. हर्षवर्धन बी.जे., तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, अहेरी श्री हेमंत चांदेवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपपोस्टे राजाराम खांदलाचे पोउपनि, श्री नारायण श्रीरामे व पोलीस अंमलदार यांनी यशस्वीरित्या पार पाडले.
—–——–————–
गडचिरोली सबादाता आशिफ़ कुरेशी

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed