भूसंपादन, धान बोनस अन् सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर; विदर्भात आंदोलनाचा इशारा!
गोंदिया जिल्ह्यात रेल्वे प्रकल्पासाठी करण्यात येत असलेल्या भूसंपादनाच्या मुद्द्यावरून शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढू लागली आहे. शेतकऱ्यांना पुरेशी माहिती न देता त्यांच्या जमिनींचे भूसंपादन करण्यात येत असल्याचा आरोप शेतकरी संघटनेने केला आहे. हे भूसंपादन रद्द करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, प्रलंबित धान बोनस तातडीने वितरित करावा आणि सिंचनाच्या प्रश्नावर ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष लक्ष्मीकांत कोठकर यांनी पत्रकार परिषदेत केली. सरकारने या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास संपूर्ण विदर्भात तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
भूसंपादन, प्रलंबित धान बोनस आणि सिंचनाच्या प्रश्नांवर सरकारने तातडीने निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे. या मागण्यांबाबत ठोस कार्यवाही न झाल्यास संपूर्ण विदर्भात व्यापक जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा लक्ष्मीकांत कोठकर यांनी दिला आहे. त्यामुळे आता सरकार या प्रश्नांवर काय भूमिका घेते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
सरोज कावळे ब्युरो हेड गोदिया
