अमरावती गुन्हे शाखेची दमदार कामगिरी! डिक्कीतून पैसे चोरणारा आणि दुचाकी चोरणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार जेरबंद, 3 गुन्हे उघड
सविस्तर बातमी:
अमरावती: मोपेडच्या गाडी च्या डिक्कीतून पैसे चोरणारा सराईत गुन्हेगार आणि मोबाईलसह दुचाकी चोरणाऱ्या गुन्हेगाराला गुन्हे शाखा युनिट 1 ने ताब्यात घेऊन एकूण 3 गुन्ह्यांची यशस्वी उकल केली आहे.
दि. 15/10/2026 रोजी फिर्यादी कल्याणी रोहन सोळंके (वय 34, कैलास नगर) यांनी राजापेठ पोलीस स्टेशनला तक्रार दिली की, साईनगर येथील भक्तीधाम मंदिराच्या पार्किंगमध्ये लावलेल्या मोपेडच्या डिक्कीत ठेवलेले 24,000 रुपये अज्ञाताने चोरले. यावरून अपराध क्र. 892/2026 कलम 303(2) BNS नोंद होता.
या गुन्ह्याचा समांतर तपास करताना गुन्हे शाखेने रेकॉर्डवरील गुन्हेगार शंतनु गजानन पाटोले, वय 22, रा. कांबळे ले-आउट, मणकर्णा नगर याला दि. 16/10/2026 रोजी ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच त्याने नवरात्रौत्सवात दुचाकीच्या डिक्कीतून चोऱ्या केल्याचेही सांगितले.
त्याची कसून चौकशी केली असता त्याने दि. 09/10/2026 रोजी इत्वारा बाजार येथे आणखी एका मोपेडच्या डिक्कीतून 15,000 रु. चोरी केल्याची कबुली दिली. याबाबत नागपुरी गेट येथे अप. क्र. 533/2026 नोंद आहे.
त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली Royal Enfield MH-27-EE-6216 (किंमत 2,00,000 रु.) आणि चोरीचे 25,000 रु. असा एकूण 2,25,000 रु. चा मुद्देमाल जप्त करून राजापेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला.
व दि. 07/10/2026 रोजी फिर्यादी श्रावणी प्रविण तुतेवार (वय 22, छांगाणी नगर) यांनी तक्रार दिली की, गुलशन प्लाझा कॉम्प्लेक्सच्या पार्किंगमधून त्यांची सिल्वर रंगाची ज्युपिटर गाडी आणि Vivo मोबाईल (7,000 रु.) चोरीला गेला. यावरून राजापेठ येथे अपराध क्र. 869/2026 नोंद होता.
यात गुन्हे शाखेने आरोपी गिरीश विठोबाजी मेहरे, वय 36, रा. देशपांडे वाडी, भूतेश्वर चौक याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून सिल्वर ज्युपिटर MH29AV8448 (50,000 रु.) जप्त करण्यात आली.
अशी एकूण 3 गुन्हे उघड:
1) राजापेठ अप. क्र. 892/2026
2) नागपुरी गेट अप. क्र. 533/2026
3) राजापेठ अप. क्र. 869/2026
ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके (परिमंडळ-1), शाम घुगे (परिमंडळ-2), प्रांजली सोनावणे, सहा. आयुक्त निलेश ब्राम्हणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि दिनेश दहातोंडे, अतुल वर, सपोनि मनीष वाकोडे, दशरथ आडे, फीरोज खान व पथकाने केली.पुढिल तपास सुरू असल्याने पोलिस प्रशासना कडून नागरिकांना चोरान पासून सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे,, जिल्हा प्रतिनिधी -कैलास वाकपांजर
