जि. अकोला: पावसाअभावी सोयाबीन, तूर, कापूस पीक उद्ध्वस्त; हेक्टरी १ लाख रुपयांच्या मदतीची शेतकऱ्यांची मागणी
अकोला रिपोर्ट गणेश वाडेकर चाणक्य न्यूज़
अकोला जिल्ह्यातील वाकापूर गावात यावर्षी पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे.
आज गावात तलाठी जामरे साहेब यांच्या उपस्थितीत पाहणी करण्यात आली. यावेळी शेख रमजान यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. यावर्षी पाऊस न झाल्याने सोयाबीन, तूर, कापूस यांसह सर्वच पिके पूर्णपणे वाळून गेली आहेत.
पिके वाया गेल्याने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झाली आहे.
शासन-प्रशासनाकडे शेतकऱ्यांनी मागणी केली आहे की, या संकटाच्या काळात सरकारने प्रति हेक्टर १,००,००० रुपये प्रमाणे नुकसान भरपाई द्यावी, जेणेकरून शेतकरी या आर्थिक संकटातून बाहेर येऊन पुन्हा रब्बी हंगामाच्या तयारीला लागू शकेल आणि कर्जाच्या ओझ्यातून मुक्त होऊ शकेल.
