जिल्हाध्यक्ष राजेश काळे यांच्या नेतृत्वात मनसेचे निवेदन : सोयाबीनचे कुटार गट्टूसाठी वापरणाऱ्या कंपन्यांवर तात्काळ कारवाई करा

0
WhatsApp Image 2026-10-20 at 11.13.30 AM

बाळापूर, दि. १९ : मनसेचे जिल्हाध्यक्ष राजेश काळे यांच्या नेतृत्वात बाळापूर व पातूर भागातील सोयाबीनचे कुटार गट्टूसाठी वापरणाऱ्या कंपन्यांवर तात्काळ कायदेशीर कारवाई व प्रतिबंध लावण्याची मागणी करण्यात आली. याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी, बाळापूर यांना निवेदन देण्यात आले.

 

बाळापूर व पातूर भागात शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीनची कापणी सुरू आहे. त्यातून निघणारा चारा व कुटार हे गट्टू बनविणारे कारखाने मोठ्या प्रमाणावर वापरत आहेत. सध्या दुष्काळ पडल्यामुळे जनावरांना आधीच चारा कमी पडत आहे. अशा परिस्थितीत कंपन्यांनी कुटार मोठ्या प्रमाणावर घेतल्यास जनावरांना चारा टंचाईची गंभीर समस्या निर्माण होईल.

त्यामुळे गट्टू बनविणाऱ्या कंपन्यांवर त्वरीत कायदेशीर कारवाई करून त्यांच्यावर प्रतिबंध लावण्यात यावा, अशी मागणी तालुका उपाध्यक्ष गणेश खोडके यांनी केली.

यावेळी मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावर तात्काळ कार्यवाही न झाल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही यावेळी दे

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed