* कन्नड (छ.संभाजीनगर) अवैध कत्तलखान्यावर खुलताबाद पोलिसांची धडक कारवाई*! “गोमांस विक्रीसाठी साठवून ठेवल्याचा प्रकार उघड; १ लाख २ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त, सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल”

0
download

कन्नड | प्रतिनिधी :- रायभान साळवे

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यात अवैधरीत्या गोवंशीय जनावरांची कत्तल करून बबलू शेख याच्या पत्र्याच्या शेड मध्ये गोमांस विक्रीसाठी साठवून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी खुलताबाद पोलिसांनी धडक कारवाई करत अंदाजे १ लाख २ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई १८ ऑक्टोबर २०२६ रोजी सहा सकाळी वाजता करण्यात आली.

 

गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांची कारवाई
खुलताबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील .राजेराय. टाकळी परिसरात अवैधरीत्या गोवंशीय जनावरांची कत्तल करून त्यांचे मांस विक्री करण्याच्या उद्देशाने साठवून ठेवल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास संबंधित ठिकाणी छापा टाकला.
या कारवाईदरम्यान घटनास्थळी गोमांस आढळून आले. पोलिसांनी पंचनामा करून अंदाजे १ लाख २ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने गोमांसाची तपासणी करण्यात आली. यावेळी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी गोमांसाचे नमुने तपासणीसाठी घेतले.
तपासणीसाठी नमुने प्रयोगशाळेत पाठविणार
पोलिसांनी जप्त केलेल्या मांसाचे नमुने पुढील तपासणीसाठी घेण्यात आले असून, त्याबाबतचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तपासाला अधिक दिशा मिळणार आहे. संबंधित ठिकाणी अवैधरीत्या कत्तल करून गोमांस विक्रीसाठी साठवून ठेवल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.उर्वरित गोमांस पंचा समक्ष लामनगाव। रस्त्यावरील शासकीय जागेत नष्ट करण्यात आले, हा कत्तल खाना पाडण्याचे काम चालू केले आहे,
या प्रकरणी खुलताबाद पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध महाराष्ट्रातील संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
पोलिसांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, या प्रकरणात पुढील आरोपींचा समावेश आहे.
१. बबलू सतार शेख
२. हुसेफ राजू कुरेशी
३. एक अनोळखी इसम यांच्या विरुद्ध कलम 325,3 (5)बी. एन. एस

सह कलम ५(बी), ५(सी) 6
महाराष्ट्र पशुसंवर्धन अधिनियमातील संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी सहायक विभागीय पोलीस अधीक्षक. अपराजिता अग्निहोत्री यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईत पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन, पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, पोलीस हवालदार प्रमोद सावळी, पोलीस कर्मचारी अनिल राजपूत, गणेश घुगे आणि किरण पगाणे यांनी सहभाग घेतला.
अवैध कत्तलखान्यांविरोधात पोलिसांचा इशारा
खुलताबाद परिसरात अवैधरीत्या जनावरांची कत्तल करणे आणि गोमांसाची विक्री करण्याच्या प्रकारांवर पोलिसांकडून लक्ष ठेवण्यात येत आहे. अशा प्रकारांमध्ये सहभागी असणाऱ्यांविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांच्या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास खुलताबाद पोलीस करीत आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed