नांदेड / हदगाव – अतुल राऊतराव हदगाव शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने विजयादशमी उत्सवानिमित्त शिस्तबद्ध पथसंचलन उत्साहात पार पडले. शहरातील प्रमुख मार्गांवर आकर्षक रांगोळ्या काढून व पुष्पवृष्टी करत स्वयंसेवकांचे स्वागत करण्यात आले.

0
download

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवानिमित्त हदगाव शहरात गणपती मिरवणुकीच्या पारंपरिक मार्गावरून शिस्तबद्ध पथसंचलन काढण्यात आले. संपूर्ण मार्गावर महिलांनी आकर्षक रांगोळ्या काढून स्वयंसेवकांवर पुष्पवृष्टी केली.

विवेकानंद प्राथमिक विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात विजयादशमीच्या परंपरेनुसार विधिवत शस्त्रपूजन करण्यात आले. यावेळी प्रमुख वक्ते देवगिरी प्रांत संपर्कप्रमुख इंद्रजीतसिंह बैस यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. व्यासपीठावर जिल्हा कार्यवाह जगदीशजी तावडे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या आयोजनात तालुका कार्यवाह दयानंद शहाजी देशमुख यांच्यासह संघ स्वयंसेवकांचा सहभाग होता.

 

शिस्तबद्ध पथसंचलन आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त स्वागतामुळे शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed