आत्मसंतोष भवनमध्ये नवरात्री उत्सवाची सांगता अकोला रिपोर्ट गणेश वाडेकर चाणक्य न्यूज़ चैनल इंडिया हिवरखेड येथील गीता पाठशाला संचालित मुख्य ओम शांती शाखेच्या आत्मसंतोष भवनमध्ये नवरात्री उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
येथे प्राकृतिक देवीच्या वेगवेगळ्या स्वरूपात नऊ दिवस देवीची स्थापना करण्यात आली होती. दररोज सायंकाळी शिवबाबा ज्ञान मुरलीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये ज्ञानदानी माँ शारदेच्या रूपात ब्रह्मकुमारी रश्मी दीदी यांनी भक्तांना मार्गदर्शन केले.
“परमात्म्याने तयार केलेल्या ईश्वररूपी बारा खांबाच्या मानवरूपी मंदिरात अंतरात्मा रूपी ज्योत सतत तेवत ठेवा. त्या ज्योतीमधील वातीला काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर या अहंकाररूपी रावणापासून दूर ठेवा आणि ज्ञानाच्या तेलाने सात्विकतेने तेवत ठेवा,” असा संदेश रश्मी दीदींनी दिला.
दि. १९ ऑक्टोबर रोजी नवमीच्या दिवशी जागराची सांगता करण्यात आली. रश्मी दीदींच्या नेतृत्वाखाली नवरात्रीत देवी बनलेल्या माता आणि भाविकांनी शाखेपासून ते गावात सुशोभित दीप मिरवणूक काढून दीपोत्सव साजरा केला.
या उत्सवात देवीदास फोपसे, गजानन येऊल, मनोहर दुतोंडे, रमेश येऊल, शिवा नेरकर, मोहन मानसेता, सुनील धुळे, संतोष शर्मा, विष्णू रेखाते, महादेव राऊत, चंदा कठाणे, सुनीता बोडखे, मंगला तारापुरे, वर्षा रेखाते, ज्योत्सना मामनकर, विद्या नेरकर, पार्वती येऊल, डांगे ताई, गंगा इरलकर, ताळे ताई आदींसह मुख्य शाखेचे असंख्य भाविक मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते.
