नांदेड | हदगाव दीपक देशमुख श्री देवी माता जगदंबाच्या दर्शनासाठी संतभूमी डोंगरगावात भाविकांची मांदियाळी
नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील संतभूमी डोंगरगाव येथे श्री देवी माता जगदंबा नवरात्र महोत्सव भक्तिमय वातावरणात साजरा होत आहे. निसर्गरम्य परिसरातील उंच टेकडीवर वसलेल्या देवीच्या दर्शनासाठी दररोज हजारो सद्भक्तांची गर्दी होत असून, नवमीनिमित्त पारंपरिक पद्धतीने होम विधी संपन्न झाला. पाहूयात याबाबतचा विशेष वृत्तांत..
संतभूमी डोंगरगाव येथील उंच टेकडीवर सातशे वर्षाच्या अगोदरपासून वसलेले हेमाडपंथी असलेले श्री देवी माता जगदंबा मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे. नवरात्रोत्सवानिमित्त पहाटेपासूनच महिला, पुरुष आणि ज्येष्ठ नागरिकांसह हजारो सद्भक्त अनवाणी पायाने येऊन देवीचे श्रद्धापूर्वक दर्शन घेत आहेत.
नवमीनिमित्त मंदिरात विधिवत पूजा, होम आणि विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. देवीच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. भाविकांसाठी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले आहे.
श्री देवी देवस्थान संस्थान, डोंगरगाव ग्रामस्थ आणि भक्तमंडळींच्या सहकार्याने हा महोत्सव उत्साहात साजरा होत असून, प्राचीन हेमाडपंथी मंदिर, संतपरंपरा आणि निसर्गरम्य वातावरणामुळे डोंगरगावात भक्ती आणि श्रद्धेचा अनोखा संगम पाहायला मिळत आहे.
बाईट १ : डॉ. निळे
बाईट २: सदभक्त
बाईट ३: मंदिर पुजारी
बाईट ४: पुजारी
बाईट ५: सदभक्त
