बंद केलेले एम.ए. अभ्यासक्रम पुन्हा सुरू करा; परीक्षा व पुनर्मूल्यांकन शुल्क कमी करा खासदार बळवंत वानखडे यांना अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीचे महानगर सचिव शुभम गोळे यांचे निवेदन

0
download

: संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत बंद करण्यात आलेले एम.ए. (पदव्युत्तर) अभ्यासक्रम पुन्हा सुरू करावेत, विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कवाढीचा निर्णय मागे घ्यावा तसेच उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनासाठी आकारण्यात येणारे शुल्क कमी करावे, या मागण्यांसाठी अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीचे महानगर सचिव शुभम गोळे यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघाचे खासदार मा. बळवंत वानखडे यांना निवेदन दिले.

 

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील काही पदव्युत्तर अभ्यासक्रम बंद झाल्यामुळे उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर अडचणी निर्माण होत आहेत. विशेषतः ग्रामीण भागातील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षणासाठी इतर ठिकाणी जावे लागल्यास प्रवासखर्चासह अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागतो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून बंद करण्यात आलेले एम.ए. अभ्यासक्रम पुन्हा सुरू करावेत, अशी मागणी शुभम गोळे यांनी निवेदनातून केली.
तसेच विद्यापीठाने परीक्षा शुल्कात केलेल्या वाढीमुळे सर्वसामान्य विद्यार्थी, शेतकरी कुटुंबांतील विद्यार्थी आणि आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या विद्यार्थ्यांवर आर्थिक भार वाढत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. सध्याच्या आर्थिक परिस्थितीचा आणि कोरड्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीचा विचार करून परीक्षा शुल्कवाढीचा निर्णय मागे घ्यावा व विद्यार्थ्यांना परवडणाऱ्या दरात परीक्षा शुल्क आकारावे, अशी मागणी करण्यात आली. या वेळेस अकोला जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रकाश तायडे, महानगर अध्यक्ष, महेंद्र गवई, सुनील वानखडे, प्रवीण खंडारे, अमित पाईकराव, वैभव आयवळे, निरज बडगे, चंद्रशेखर नकाशे, पक्षाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते,

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed