मानवत येथे भव्य मोफत नेत्ररोग तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया व आयुष्यमान कार्ड वाटप शिबिर उत्साहात संपन्न

0

लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आमदार राजेशदादा विटेकर यांच्या संकल्पनेतून उपक्रम”

​परभणी/प्रतिनिधी :- रमेश मुलगीर

लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून पाथरी विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांसाठी भव्य मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. आमदार राजेशदादा विटेकर यांच्या संकल्पनेतून मंगळवार, दिनांक २८ जुलै २०२६ रोजी ग्रामीण रुग्णालय, मानवत येथे हे शिबीर अत्यंत उत्साहात पार पडले.
​उद्घाटन व अध्यक्षीय सोहळा:
​कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ व्यापारी तथा नगरसेवक श्री प्रकाशशेठ पोरवाल यांनी भूषवले, तर शिबिराचे उद्घाटन मानवत नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष डॉ. अंकुश बाळाजी लाड यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोजभाऊ देशमुख (आरोग्य सेवक) यांनी केले.
​वैद्यकीय पथक व आरोग्य सेवा:
​या शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने रुग्णांची मोफत तपासणी करून उपचार केले. यामध्ये प्रामुख्याने:
​वैद्यकीय अधिकारी व नेत्रतज्ज्ञ: डॉ. आसेफ शेख (वैद्यकीय अधीक्षक), डॉ. पंकज दस्क, डॉ. भगवान वायस, रोहित स्वामी (नेत्र चिकित्सक), आदित्य शेवाळे, बसवेश्वर मठपती आदींनी रुग्णांची तपासणी केली.
​पुरवण्यात आलेल्या सुविधा: शिबिरात रुग्णांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, डोळ्यांच्या नंबरची तपासणी करून मोफत चष्मे वाटप, नेत्ररोग तज्ज्ञांमार्फत औषध वाटप तसेच गरजू नागरिकांना आयुष्यमान भारत कार्डचे वाटप करण्यात आले.
​प्रमुख उपस्थिती व मान्यवर:
​या प्रसंगी राजकीय, सामाजिक व प्रशासकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते:
​विशेष उपस्थिती:
​श्री दलपतराव जाधव (जि.प. सदस्य तथा कृ.उ.बा.स. सभापती)
​श्री विष्णूपंत निवळ (पंचाायत समिती सभापती)
​उपस्थित मान्यवर व पदाधिकारी:
​संजय बिहारीलाल बांगड, गणेश कचरुलालजी कुमावत, दत्ताभाऊ चौधरी, राजूभाऊ खरात, राजेश वासुंबे, अभिषेक आळसपुरे, गणेश मोरे पाटील, किशोरभाऊ लाड, , मोहनभाऊ लाड, नियामतखान पठाण, बाजीराव हळनोर, स्वप्निल केशवराव शिंदे, गणेश उगले, डॉ. राजेश दहे, लक्ष्मण शिंदे (पं.स. सदस्य), किरण मगर (तालुका अध्यक्ष रा.यु.का.), प्रेम रणखांबे (पं.स. सदस्य), संतोषराव लाडाणे (सरपंच केकडजवळा), शिवाजीराव कुरकुंडे (चेअरमन कोल्हे), अशोकजी कचरे (सरपंच), सार्थिक साबळे, साजिद शेख, किरण मगर, अनिरुद्ध पांडे, प्रसाद जोशी, लालाजी बारहाते, सत्यशील धबडगे, मुकुंदराव मगर (सरपंच), अंबादास तूपसमुद्रे, नगरसेवक यांच्या सह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
​या शिबिराचा मानवत शहर व परिसरातील शेकडो गरजू व ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घेतला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed