अकोला:बाळापूर बस स्थानक घाणीने माखलं अकोला रिपोर्ट गणेश वाडेकर ब्यूरोचीफ चाणक्य न्यूज़ चैनल इंडिया शहराची ओळख असलेलं मुख्य बस स्थानकच जर असं घाणेरडं असेल तर खूपच दुर्दैवी आहे.
सध्याची परिस्थितीः
कचऱ्याचे ढिग, प्लास्टिक, घाणेरडं पाणी आणि प्रचंड दुर्गंधी
दरोज शेकडो प्रवासी शाळकरी मुले, महिला, वृद्ध, ग्रामीण भागातील लोक याच स्थानकाचा वापर करतात
कंत्राट असूनही स्वच्छता नाही – कंत्राटदार काम करत नाही, नगरपरिषद दुर्लक्ष करत आहे
पावसाळ्यात धोका जास्त – साचलेल्या पाण्यामुळे डास वाढताहेत
आरोग्याला धोकाः
डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया सारखे आजार पसरण्याची भीती नागरिकांना आहे. विद्यार्थ्यांना आणि वृद्धांना सर्वात जास्त त्रास होतोय.
बस स्थानक स्वच्छ नसेल तर प्रवाशांना पहिल्या भेटीतच शहराबद्दल वाईट मत तयार होतं. प्रशासनाने तातडीने कंत्राटदारावर कारवाई करून दररोज स्वच्छतेची व्यवस्था करायला हवी
