कन्नड विधानसभा संघटनात्मक व आढावा बैठक संपन्न!
कन्नड विधानसभा संघटनात्मक व आढावा बैठक संपन्न!
जिल्हा प्रभारी मा. खा. डॉ. प्रीतमताई मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत व भाजपा जिल्हाध्यक्ष मा. श्री. संजय खंबायते यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय जनता पार्टी, कन्नड विधानसभा संघटनात्मक व आढावा बैठक उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.

भारताचे लोकप्रिय पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येणाऱ्या ‘सेवा संकल्प अभियान’ संदर्भात बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेत आगामी कार्याचे नियोजन करण्यात आले. मंडळ व बूथ स्तरावर विविध सेवाभावी उपक्रम प्रभावीपणे राबवून हे अभियान जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन करण्यात आले.

यावेळी डॉ. संजय गव्हाणे, जिल्हा सरचिटणीस सुभाष काळे, भरतसिंग राजपूत, मंडळ अध्यक्ष सुनील पवार, श्रीराम जंजाळ, ललित सुरासे,जिल्हा सचिव बबनराव बनसोड,जि. प. सदस्य डॉ. तृप्ती ताई राजूपत, मंजुषा ताई मलदोडे, मा सभापती प्रकाशराव घुले पंचायत समिती उपसभापती माया ताई सुरासे, संतोष करवंदे, संघर्ष बोलधने, ,प्रशांत अग्रवाल, साहेबराव गवळी,सुधाकर देवकर, कचरू आव्हाळे, डॉ. दिलीप सिंग राजपूत,सौरभ कुलकर्णी, कैलास जाधव, निखिल अग्रवाल, सुदाम पवार यांच्यासह सर्व जिल्हा व मंडळ पदाधिकारी उपस्थित होते.
