पतंगाच्या नादात महामार्गावर आलेल्या १२ वर्षीय चिमुकल्याचा कारच्या धडकेत जागीच मृत्यू अकोला रिपोर्ट गणेश वाडेकर चाणक्य न्यूज़ चैनल मूर्तिजापूर (अकोला): मूर्तिजापूर शहरातील हॉटेल
कोहिनूरजवळ एक हृदयद्रावक अपघात घडला आहे.
अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे पतंग उडवत असताना राष्ट्रीय महामार्गावर आलेल्या सैय्यद रौनक सैय्यद अल्ताफ मदारी (वय १२) या चिमुकल्याला भरधाव कारने जोरदार धडक दिली.
या भीषण अपघातात रौनकचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
घटनास्थळः हॉटेल कोहिनूरजवळ, राष्ट्रीय महामार्ग, मूर्तिजापूर, अकोला.
