दि. 02/10/2026 महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री जयंतीनिमित्त गडचिरोली पोलीस दलाचा वृक्षलागवडीचा संकल्प • जिल्ह्रातील 70 पोस्टे/उपपोस्ट/पोमके स्तरावर 50 हजार वृक्षांची लागवड • गडचिरोली पोलीस दलाने पोलीस कवायत मैदान येथे घेतली सायबर सुरक्षेची प्रतिज्ञा
“हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र” या संकल्पनेतून राज्यातील हरित क्षेत्रात वाढ करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाचा उपक्रम राबविण्यात येत आहे. याच उद्देशाने राज्यात 10 कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असताना या व्यापक अभियानाला हातभार लावत गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. 02 ऑक्टोबर 2026 रोजी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंतीच्या पाश्र्वभूमीवर पोलीस कवायत मैदानाच्या परिसरात पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत नागरिकांमध्ये सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
सविस्तर वृत असे आहे की, याच पर्यावरण संवर्धनाच्या व्यापक उद्देशाला हातभार लावत गडचिरोली पोलीस दलाने महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री जयंतीचे औचित्य साधून पोलीस अधीक्षक गडचिरोली, श्री. एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व अंमलदारांनी पोलीस कवायत मैदान परिसरात वृक्षारोपन केले तसेच जिल्हाभरातील 70 पोस्टे/उपपोस्टे/पोमकें स्तरावर 50 हजार वृक्ष लागवड करण्यात आली. या पाश्र्वभुमीवर पोलीस दलाकडून वृक्ष लागवडीसोबतच पर्यावरण संवर्धन, हरित आणि सुरक्षीत समाज निर्मितीचा संदेश नागरीकांपर्यंत पोहचविण्यात आला.
तसेच सध्याच्या डिजिटल युगात इंटरनेट, ऑनलाइन बँकिंग व सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून, त्यासोबतच विविध प्रकारच्या सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही वाढत आहे. केवायसीच्या नावाखाली फसवणूक, बनावट शेअर ट्रेडिंग, ऑनलाइन कर्ज, बनावट खरेदी संकेतस्थळे, बनावट कस्टमर केअर क्रमांक, एपीके फाईल, फिशिंग, सोशल मीडिया हॅकिंग, बनावट नोकरीच्या ऑफर तसेच ‘डिजिटल अरेस्ट’ अशा विविध प्रकारे नागरिकांची फसवणूक केली जात आहे. या पाश्र्वभुमीवर अशा फसवणूकीवर पायबंद व्हावा, यापुढे लोकांची फसवणूक होऊ नये म्हणून व गडचिरोली जिल्ह्यातील नागरिक हे सायबर साक्षर व्हावेत या उद्देशाने गडचिरोली पोलीस दलातर्फे सायबर गुन्ह्यांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करून सुरक्षित डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने दि. 01 ऑक्टोंबर ते 31 ऑक्टोंबर या कालावधीत ‘सायबर जनजागृती महिना’ आयोजित करण्यात आला आहे. याच उपक्रमाची सुरुवात करण्याच्या अनुषंगाने आज रोजी गडचिरोली येथील पोलीस कवायत मैदानावर पोलीस अधिकारी व अंमलदारांनी ‘सायबर प्रतिज्ञा’ घेतली.
या कार्यक्रमाप्रसंगी वृक्षलागवड ही केवळ एक दिवसाची मोहिम न राहता पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांनी या उपक्रमांत सहभागी व्हावे तसेच सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे तसेच नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक खबरदारी घेणे, सायबर सुरक्षेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करणे आणि सुरक्षित डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन गडचिरोली पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रम प्रसंगी पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. एम. रमेश, यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी., प्रभारी पोलीस उप-अधीक्षक (गृह) श्री. शैलेंद्र ठाकरे, स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोली पोनि श्री. अरुण फेगडे व इतर अधिकारी आणि अंमलदार उपस्थित होते.
————————-
गडचिरोली सबादाता आशिफ़ कुरेशी

