अकोल्यात महसूल मंत्री बावनकुळे यांचा बँकांना कडक इशारा; म्हणाले – शेतकऱ्यांना त्रास देऊ नका!

0
download

अकोला रिपोर्ट गणेश वाडेकर चाणक्य न्यूज़ चैनल
अकोला: शेतकऱ्यांच्या तक्रारी जाणून घेतल्यानंतर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अकोल्यात बँका, पतसंस्था आणि सावकारांना कडक शब्दांत इशारा दिला आहे.

“दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांकडून सक्तीने कर्जाचे हप्ते वसूल करून त्यांना त्रास देऊ नका. जर कोणी शेतकऱ्यांना त्रास देत असेल तर त्याची तक्रार तात्काळ प्रशासनाकडे करा,” असे आवाहन बावनकुळे यांनी केले.

पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल आणि येत्या दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
तसेच, शेतकऱ्यांनी आर्थिक संकटामुळे खचून जाऊन आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये, असे भावनिक आवाहनही महसूल मंत्र्यांनी यावेळी केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed