अकोला: महानगरपालिका मनपा प्रशासनाव्दारा आकोट फैल येथील अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई.
अकोला रिपोर्ट गणेश वाडेकर चाणक्य न्यूज़ चैनल
अकोला दि. 06 ऑक्टोंबर 2026 – अकोला महानगरपालिका उत्तर झोन स्थित आकोट फैल येथील मौजे शिलोडा, गट क्रं. 115, सर्व्हे नं. 42/2, प्लॉट क्रं. 59, 60 या जागेवर जफर अकबर खान यांनी अकोला महानगरपालिकेची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता गुंठेवारी प्लॉटवर अनधिकृतरित्या बांधकाम केल्याबद्दल प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने आज दि. 6 ऑक्टोंबर 2026 रोजी मनपा अतिक्रमण व उत्तर झोन कार्यालयामार्फत पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने निष्कासनाची कारवाई करण्यात आली आहे.
सदर कारवाईत सहा.आयुक्त विठ्ठल देवकते, सहा.अतिक्रमण अधिकारी प्रवीण मिश्रा, चंद्रशेखर इंगळे, कनिष्ठ अभियंता पियूश बंगाले, प्रतीक पांडव यांचेसह आकोट फैल पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी तसेच अतिक्रमण निर्मुलन पथकातील सर्व कर्मचा-यांची उपस्थिती होती.

