कन्नड ” आदिवासी भिल्ल समाजाला प्रेत दफन करण्यापासून रोखले ” समाजाचे तहसीलदार यांना निवेदन कन्नड प्रतिनिधी: रायभान साळवे

0
download

मौजे खेड़ा ( आठेगाव ) कै .गिरजाबाई गोपीनाथ सोनवणे या 60 वर्षीय वृद्ध महिलेचे निधन दिनांक 18 रोजी झाले , जेव्हा गावातील काही नातेवाईक त्यांचा दफनभूमीत टिकाव फावडा घेऊन खड्डा (कबर ) करण्यासाठी ज्या सरकारी जमिनीवर गेले असता तेथे अतिक्रमण धारक शेतकरी गजानन चंद्रभान शेळके, मच्छिंद्र चंद्रभान शेळके यांनी त्यांना खड्डा खणण्यास मज्जाव केला हे एकाता च गावातील ग्रामस्थ संतापजनक परिस्थिती त त्यांना जाब विचारायला गेले असता त्यांनी येथे मृतदेह ठेऊ देणार नाही हा पवित्रा घेतला तेव्हा ग्रामस्थांनी मृतदेह चा अंत्यसंस्कार न करताच सकाळी मृतदेह तहसील कार्यालयात आणण्याचे निश्चित केले मात्र, मृतदेह कार्यालयात येण्याआधीच तहसिलदार सारिका भगत यांनी आपले पथक घटनास्थळी पाठवुन. ज्या मध्ये मंडळ अधिकारी श्री निकाळे साहेब, तलाठी. सौ शिल्पा काशिनंद, ग्रामसेवक श्रीमती एस एम देवरे, पोलीस हवालदार बाबासाहेब धनुरे,सुरेश शिंदे, धरम राजपूत, यांनी परिस्थिति हाताळून समेट घडवून आणला.
त्या अगोदर गावातील आदिवासी भिल्ल समाजाच्या ग्रामस्थांनी तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदार श्रीमती सारिका भगत यांना निवेदन देऊन कायमस्वरूपी स्मशान भूमि मिळण्यासाठी मागणी केली.
मा.तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात अशी मागणी केली की मृतदेहाची अंत्यसंस्कार होण्यासाठी प्रशासनाने त्वरित मध्यस्थी करावी, तसेच पोलीस प्रशासनास पाचारण करून विना अडथळा आजच मौजे खेड़ा येथील गट क्रमांक 01 मध्ये मृत महिलेचा अंत्यसंस्कार सुरक्षित पणे पार पाडण्यासाठी कायदेशीर संरक्षण मिळून द्यावे.
निवेदनावर सुनील ठाकरे, (मराठवाडा अध्यक्ष एकलव्य संघटक),बापू नलावडे,( टाइगर फोर्स अध्यक्ष) मंगेश सोनवणे, आकाश गायकवाड, अनिल सोनवणे, संतोष सोनवणे, आणि अनेक ग्रामस्थांनी सह्या केल्या आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed