४२५० रुपये पहिली उचल द्या; अन्यथा कारखाना चालू देणार नाही! “रेणुका शुगरच्या गव्हाणीत उतरून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन; अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली कारखाना बंद पाडला” परभणी/प्रतिनिधी : रमेश मुलगीर
पाथरी : परभणी जिल्ह्यातील पाथरी येथील रेणुका शुगर कारखान्याच्या ऊसदराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पहिली उचल प्रतिटन ४ हजार २५० रुपये देण्याच्या मागणीसाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि. १९ ऑक्टोबर) सकाळपासून कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर निदर्शने करण्यात आली. मात्र, कारखाना व्यवस्थापनाकडून चर्चेसाठी पुढाकार घेतला जात नसल्याचा आरोप करत संतप्त शेतकऱ्यांनी थेट कारखान्याच्या गव्हाणीत उतरून आंदोलन सुरू केले. या आंदोलनामुळे कारखान्याचे कामकाज बंद पाडण्यात आले.
पहिली उचल ४२५० रुपये देण्याची मागणी
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या उसाला योग्य दर मिळावा, या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत. सध्याच्या परिस्थितीत ऊस उत्पादनासाठी लागणारा वाढता खर्च, मजुरी, खते, औषधे, पाणी आणि वाहतूक यांचा खर्च लक्षात घेता उसाला समाधानकारक दर मिळणे आवश्यक असल्याची भूमिका शेतकरी मांडत आहेत. त्यामुळे रेणुका शुगर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पहिली उचल प्रतिटन ४ हजार २५० रुपये द्यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.
गेटवरील निदर्शनांनंतर गव्हाणीत उतरून आंदोलन
महराजगंज घुघली थाने का मिशन शक्ति केंद्र,बना सर्जिकल स्तरीय मॉडल केंद्र , महिलाओं को किया जागरूक
अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी सोमवारी सकाळपासून रेणुका शुगरच्या मुख्य प्रवेशद्वारावर एकत्र येत निदर्शने केली. ऊसदराच्या प्रश्नावर कारखाना व्यवस्थापनाने शेतकऱ्यांशी चर्चा करून निर्णय घ्यावा, अशी आंदोलकांची मागणी होती. मात्र, व्यवस्थापनाकडून चर्चेसाठी पुढाकार घेतला जात नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
त्यानंतर संतप्त ऊस उत्पादक शेतकरी आणि किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी कारखान्याच्या गव्हाणीत उतरून आंदोलन सुरू केले. गव्हाण बंद करून शेतकऱ्यांनी आपला निषेध नोंदविला. पहिली उचल जाहीर केल्याशिवाय कारखाना सुरू होऊ देणार नसल्याचा निर्धार यावेळी आंदोलकांनी व्यक्त केला.
मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार
ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कारखाना व्यवस्थापनाने तातडीने चर्चा करावी आणि प्रतिटन ४ हजार २५० रुपये पहिली उचल देण्याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.
“जोपर्यंत उसाला प्रतिटन ४ हजार २५० रुपये पहिली उचल मिळत नाही, तोपर्यंत रेणुका शुगर कारखाना चालू देणार नाही,” असा ठाम निर्धार ऊस उत्पादक शेतकरी आणि किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
रेणुका शुगरच्या ऊसदराच्या प्रश्नावर सुरू झालेल्या या आंदोलनामुळे पाथरी परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष आता कारखाना व्यवस्थापनाच्या भूमिकेकडे लागले आहे. व्यवस्थापन शेतकऱ्यांच्या मागणीवर काय निर्णय घेते आणि ऊसदराचा प्रश्न चर्चेतून सुटतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
