देशातील ग्रामीण भागातील पहिले मंदिर! हरिजनांसाठी खुले झाले मुन्हादेवीचे मंदिर महाराष्ट्रात कोरडा दुष्काळ पडल्याने त्याचा परिणाम यात्रेवर दिसत आहे

0
download

*हरिजनांसाठी खुले झालेले देशातील ग्रामीण भागातील मुन्हादेवीचे पहिले मंदिर – आदिवासींना दर्शन देण्यासाठी प्रगटली मुन्हा देवी*अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यात मुर्हा देवी
ब्रिटिश काळात देशभर हरिजनांना मंदिर खुली करावी म्हणून महात्मा गांधींनी चळवळ सुरू केली होती. त्यानुसार अंजनगाव सुर्जी येथे स्वातंत्र्यपूर्व काळापासून हरिजनांना दर्शनासाठी हे पहिले मंदिर खुले झालेले देशातील ग्रामीण भागातील पहिले मंदिर ठरले आहे.या मंदिराला आठसे वर्षाचा इतिहास आहे,
संपूर्ण विदर्भातून नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भक्त मोठ्या श्रद्धेने देवीच्या दर्शनासाठी मुर्हा देवी येथे गर्दी करतात परंतु या वर्षी निसर्गाच्या लहरी पणा मुळे महाराष्ट्रातील शेतकरी राजा हवालदिल झाला आहे, नापिकीमुळे शेतकरी मजूर वर्गावर उपासमारीची वेळ आली आहे,याचेच प्रत्यय यात्रेव दिसत आहे,,या वर्षी यात्रेमध्ये फारशी गर्दी दिसत नसल्याने छोट्या छोट्या मोठ्या व्यावसायानवर उपासमारीची वेळ आली आहे, यात्रेमध्ये दरवर्षी च्या तुलनेत या वर्षी शुकशुकाट दिसत आहे,, महाराष्ट्रात कोरडा दुष्काळ असल्याने शेतकरी,मजूर,व्यावसायिक,व हौशी भक्त, यांचा उत्साह हिरमुसला आहे,, सर्व भक्त गण जगदंबा मातेला एकच मागणं मागत आहेत की माझ्या शेतकरी राज्याला दुष्काळी संकटातून सावरण्याच बळ दे ,आणी महाराष्ट्र सरकार ला हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना भरीव मदत करण्याची सत्तबुद्धी देवो हेच साकळ जगदंबा मातेच्या चरणी . जिल्हा प्रतिनिधी -कैलास वाकपांजर

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed