अमरावती ग्रामीण LCB ची मोठी कारवाई *अमरावती ग्रामीण LCB ची धडक कारवाई! मध्यप्रदेशातून येणारी 2.29 लाखांची विदेशी दारू जप्त, दोन तस्कर जेरबंद

0
download

अमरावती (दि.19/10/2026) : मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात अवैधरित्या विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती ग्रामीणने ऑपरेशन कवच अंतर्गत मोठी कारवाई केली आहे.
पोलीस अधीक्षक निकेतन कदम (भा.पो.से.) यांनी अवैध धंद्यांवर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार LCB ला गोपनीय माहिती मिळाली होती की, मध्यप्रदेश – महाराष्ट्र सिमेवरील आटनेर मार्गातून सालबर्डी, पाळा, मोर्शी मार्गे वर्धा जिल्ह्याकडे चारचाकी व रंगाची सुजुकी सियाझ कारने विदेशी दारूची तस्करी होणार आहे.या गुप्त माहिती च्या आधारावर
मिळालेल्या माहितीवरून LCB च्या पथकाने मोर्शी रोडवरील ग्राम धानोरा टी पॉईंट येथे सापळा लावला. त्यावेळी एक सुजुकी सियाझ कार सालबर्डी कडून सापळा लावलेल्या ठिकाणाकडे येताना दिसली. तसेच त्या गाडीला संरक्षण देण्यासाठी एक पांढऱ्या रंगाची बोलेरो कार सुध्दा तिच्या समोर असल्याचे दिसले.
पथकाने दोन्ही गाड्यांना थांबण्याचा इशारा केला असता बोलेरो मॅक्स चालक पळून गेला, तर सुजुकी सियाझ चालकही पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी अत्यंत शिताफीने त्याला पकडले.

 

 

 

 

 

जप्त मुद्देमाल:*
कारमध्ये दोन इसम मिळाले. त्यांची नावे –
1) इमरान शेख अब्दुल सत्तार, वय 35 वर्ष
2) फैजान खान जफर खान, वय 20 वर्ष (दोघे रा. महादेवपुरा, वर्धा)
त्यांच्या कारची पंचासमक्ष झडती घेतली असता 40 बॉक्समध्ये एकूण 803 नग विदेशी दारूच्या बाटल्या (किं. 2,29,554 रु.) मिळून आल्या.
चौकशीत त्यांनी सांगितले की, पळून गेलेले दोन साथीदार (फरार आरोपी) यांनी ही दारू महाराष्ट्र – मध्यप्रदेश सिमेवरून आणून दिली आणि ती वर्धा जिल्ह्यात विकायची होती.
पोलिसांनी एकूण 40 पेट्या दारू (2,29,554 रु.) + तस्करीसाठी वापरलेली सुजुकी सियाझ कार व महिंद्रा बोलेरो वाहन + 03 मोबाईल असा एकूण 14,39,554 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी पोलीस स्टेशन मोर्शी येथे कलम 65(ड)(अ)(ई), 72,75,83 महाराष्ट्र दारूबंदी कायदा सहकलम 281 भा.न्या.सं. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. फरार 2 आरोपींचा शोध सुरू आहे.
ही कारवाई* पोलीस अधीक्षक श्री. निकेतन कदम, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. दत्ता तोटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली LCB चे पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक आकाश शिवणकर, अंमलदार रुपेश गावंडे, विवेक घोरमाडे, शांताराम सोनोने, चालक प्रशिक वानखडे यांच्या पथकाने केली.
पुढिल तपास अमरावती पोलीस करीत आहेत. ***जिल्हा प्रतिनिधी -कैलास वाकपांजर**

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed